Late Jaykumar Tibrewal English Medium School,Nashik Road(Prathmik)

शाळेचा इतिहास

'देश हा देव असे माझा' या भावनेने झपाटलेल्या पुण्याच्या फर्गुसन कॉलेजमध्ये शिकणा-या पाच विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने दिनांक १ मे १९१८ रोजी 'नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ' या संस्थेची स्थापना केली. आज संस्थेस १०४ वर्षे पूर्ण झालेली आहेत. संस्थेचा विस्तार पाच संकुलाप्रमाणे झालेला आहे. त्यात नाशिक, नाशिकरोड, सिन्नर, इगतपुरी, नांदगाव या संकुलांमध्ये बालमंदिर, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक महाविद्यालये, विविध अभ्यासक्रमे इ. एकूण ४६ विद्यामंदिरांचा समावेश आहे.

जून १९९८ साली नाशिकरोड, जेलरोड व आजूबाजूच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक वातावरणाचा व काळाच्या बदलत्या स्पर्धात्मक युगाचा विचार करता संस्थेने नाशिकरोड संकुलात 'न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल, नाशिकरोड' या नावाने बालमंदिर व प्राथमिक शाळा आरंभ महाविद्यालयाच्या इमारतीत सुरु केली. सुरुवातीस संस्थेतील व संकुलातील काही शिक्षक संस्थेच्या मार्गदर्शनाने सातत्त्याने विद्यार्थी प्रवेशासाठी प्रयत्न करू लागले. संकुलातील शिक्षकांनी आपल्या मुलांचे या शाळेत प्रवेश घेतले. विद्यार्थी संख्या अत्यंत कमी होती. विविध कार्यक्रम वाढू लागली. व शिक्षणाचा दर्जा यामुळे शाळेचा लौकिक पसरू लागला. विद्यार्थ्यांची संख्या शाळेचे अधीक्षक श्री. अरुण पैठणकर व अध्यक्ष श्री. सुरेश कपोते यांचे सचोटीच्या प्रयत्नांमुळे शाळा चांगल्या नावारूपाला आली. शाळेस शासनाच्या मान्यता मिळाल्या. नैसर्गिक वाढीने पुढील वर्ग सुरु होत होते. उपक्रमशील शिक्षक वाढू लागले त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत होता. वर्ग संख्या कमी पडू लागली. संस्थेचे शाळेवर नितांत प्रेम होते कारण संस्थेची इंग्रजी माध्यमाची पहिली शाळा बहरू लागली होती. शासनाच्या अधिकारी, केंद्र प्रमुख, संस्था पदाधिकारी व हितचिंतक यांनी शाळेला उत्तम मार्गदर्शन व सहकार्य दिले.

सन २००२-०३ साली सौ. शुभा संत मॅडम यांनी प्रभारी मुख्याधापिका व श्रीमती मंजिरी लेले मॅडम अधीक्षिका म्हणून लाभल्या आणि शाळेचा प्रगतीचा काला सुरु झाला. शाळेत विविध उपक्रम - कै. वा. श्री. पुरोहित एकांकिका स्पर्धा, बाल महोत्सव, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, विज्ञान प्रदर्शने, ग्रंथ दिंडी, क्रीडा महोत्सव, स्नेह संमेलन इ. दिमाखात सुरु झाले.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत गेला त्यामुळे शाळेचे विशेष नावलौकिक व्हायला सुरुवात झाली. बघता बघता विद्यार्थी संख्या मोठ्‌या प्रमाणात वाढू लागली. सन २००७ साली शाळेच्या इमारतीची गरज विचारात घेता संस्थेने दिनांक २२-९-२००७ रोजी प्रमुख पाहुणे श्री. अजित देशपांडे (शिक्षण उपसंचालक), संस्थेचे अध्यक्ष श्री. काकासाहेब नाईक, डॉ. वि. रा. काकतकर, कार्याध्यक्ष श्री. प्रवीण बुरकुले, सेक्रेटरी श्री. उदय शेवतेकर, प्रभारी मुख्याधापिका सौ. सीमा निलजीकर यांच्या उपस्थितीत शाळेच्या नूतन इमारतीच्या पहिल्या मजल्याचा उद्घाटन सोहळा पार पडला. त्याप्रसंगी संस्थेचे व शाळेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, हितचिंतक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तळमजला व पहिला मजला बांधून झाल्यावर शाळा नूतन इमारतीत भरू लागली. संस्था व शाळेच्या नावलौकिकामुळे जेलरोड, नाशिकरोड, शिंदे, पळसे, देवळाली गाव इ. पंचक्रोशीतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात येऊ लागले. वर्ग व तुकड्या वाढल्या. अतिरिक्त जादा वर्गखोल्यांची गरज भासू लागली. देणगीदार श्री. सुरेश कपोते सर, डॉ. सारंग इंगळे सर, डॉ. पल्लवी इंगळे यांनी नूतन इमारतीतील वर्गखोल्यांसाठी देणगी दिली. संस्थेने उद्घाटन सोहळ्याद्वारे त्या नूतन वर्गखोल्यांचे देणगीदारांच्या नावाने नामकरण केले. त्याप्रसंगी सन्मानीय देणगीदार शिक्षण उपसंचालक श्री. अजित देशपांडे यांच्या हस्ते सत्कार केला. डॉ. सारंग इंगळे (उपाध्यक्ष - पालक शिक्षक संघ) यांच्या प्रयत्नातून शाळेत रंगीत टीव्ही उपलब्ध झाला. शाळेच्या वाढत्या विद्यार्थीसंख्येमुळे शाळेस वर्गखोल्या व इतर भौतिक सुविधांची गरज भासू लागली. डॉ. सारंग इंगळे (शालेय समिती अध्यक्ष) यांच्या अथक प्रयत्नाने व संस्थेच्या मार्गदर्शनाने शाळेला उदात्त देणगीदार आदरणीय श्री. मनोज जयकुमार टिबरेवाला व कुटुंबीय यांनी शाळेस रु. ६१,००,००० लक्ष देणगी दिली. त्या देणगीतून शाळेचे दोन मजले बांधकाम करण्यात आले. नूतन इमारत उद्घाटन समारंभ व नामकरण सोहळा दिनांक १८-२-२०१२ रोजी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. गिरीश प्रभूणे, प्रमुख पाहुणे मा. श्री. विकास आमटे, सन्मानीय देणगीदार श्रीमती गुणवंतीबेन टिबरेवाला व कुटुंबीय, संस्थेचे कार्याध्यक्ष मा. श्री. महेश दबक, मा. श्री. प्रवीण बुरकुले, सेक्रेटरी मा. श्री. अरुण पैठणकर, शालेय समिती अध्यक्ष मा. डॉ. सारंग इंगळे, मा. डॉ. अजित जुनागडे, अधीक्षिका सौ. वैजयंती पवार, मुख्याधापिका श्रीमती ज्योती मोदियानी व संकुलातील विविध शाळांचे मान्यवर पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. नामकरण सोहळ्यात संस्थेने शाळेचे नाव 'लेट जयकुमार टिबरेवाला इंग्लिश मिडीयम स्कूल' असे जाहीर केले.

शैक्षणिक वर्ष सन २०१०-११ मध्ये दहावीची पहिली बॅच मा. श्री. जामखेडकर सर, डॉ. इंगळे सर, अधीक्षिका मा. वैजयंती पवार मॅडम, मुख्याधापिका श्रीमती ज्योती मोदियानी मॅडम, संस्थेच्या इतर शाळेतील शिक्षक व शाळेतील शिक्षक यांच्या मार्गदर्शनाने १००% निकाल लागून उज्ज्वल यश प्राप्त केले. त्यानंतर माध्यमिक शाळेस एस.एस. कोड व सांकेतिक क्रमांक प्राप्त झाला. त्यानंतर शाळेचे दहावीचे विद्यार्थी शाळेमार्फत बोर्डाची परीक्षा देऊ लागले. शाळेची प्रसिद्धी समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत प्रकाशाप्रमाणे पसरू लागली. शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी वाढू लागल्या. अनेक तज्ञांचे विद्यार्थ्यांना पूरक मार्गदर्शन मिळू लागले व त्याद्वारे विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर नावारूपास येऊ लागले. शालेय अध्यापनात शिक्षणाचा दर्जा वाढू लागला. स्पर्धापरीक्षांच्या सूक्ष्म नियोजनामुळे विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकू लागले. फंक्शनल इंग्लिश कोर्स - ब्रिटीश कौन्सिल परीक्षा, शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा, एकांकिका स्पर्धा, एन.टी.एस व एम. टी. एस परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, संगणक क्षेत्रातील विविध स्पर्धा, क्रीडा स्पर्धा इ. ची चांगल्याप्रकारे तयारी करून घेतली जाते. कोव्हीड काळात शाळा ऑनलाइन पद्धतीने उत्तमरीत्या सुरु होती.

सन २०२० मध्ये शाळेच्या इमारतीस शाळेतील शिक्षक व पालक देणगीदार यांच्या आर्थिक सायातून रंगकाम केले गेले. आज शाळेत अद्यावत वातानुकूलित संगणक कक्ष, सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, ओडीयो-व्हिडीओ कक्ष, ग्रंथालय, चित्रकला वर्ग, सेमिनार हॉल, इनडोअर खेळ कक्ष, प्रशस्त क्रीडांगण, स्वच्छता गृहे, विद्यार्थी व शिक्षकांसाठी शुद्ध पेयजल प्रणाली यंत्र, अग्निरोधक यंत्र, शाळेच्या चारही बाजूस संरक्षक भिंत व संपूर्ण शालेय परिसर सी.सी. टीव्हीच्या नियंत्रणात कार्यरत असतो इ. विविध सुविधा उपलब्ध आहेत.

नुकतेच पालकांमार्फत इलेक्ट्रॉनिक सॅनीटाइझर यंत्र बसविण्यात आले तसेच इ. दहावीच्या बहिस्थ विद्यार्थ्यांकडून शाळेस तीन आसनी दोन बाक सप्रेम भेट देण्यात आले.

शाळेच्या उपक्रमांचे फोटो व माहिती

मराठी राजभाषा दिन साजरा करतांना

आषाढी एकादशी साजरी करतांना

दही हंडी साजरी करतांना

शिवजयंती साजरी करतांना

सावित्रीबाई फुले जयंती साजरी करतांना

सावरकर जयंती साजरी करतांना

विज्ञान प्रदर्शन

व्हर्चुअल बाप्पा स्पर्धा

शाडू माती गणपती कार्यशाळा

शाळेचे मुख्याध्यापक व शाळा समिती अध्यक्षांचे फोटो व नाव

श्रीमती ज्योती दिपक मोदियानी

मुख्याध्यापिका
Email:

विवेक रघुनाथ अराणके

शालेय समिती अध्यक्ष (प्राथमिक विभाग)
Email:

शाळा समिती यादी

क्र. समिती सदस्याचे नाव समितीतील पद
1 श्री. विवेक रघुनाथ अराणके अध्यक्ष
2 श्रीमती ज्योती दीपक मोदियानी सचिव
3 श्री. योगेश बलराज भगत सदस्य
4 डॉ. श्री. सारंग अशोक इंगळे सदस्य
5 सौ. स्वाती रुपेश धारकर सदस्य (टी. एम.)
6 श्रीमती कांचन बाळकृष्ण कुऱ्हाडे शिक्षक प्रतिनिधी
7 श्रीमती अश्विनी हिरामण मुळाणे शिक्षकेतर प्रतिनिधी

Contact Details

For any kind of query, contact us with the details below.

शाळेचे संपूर्ण नाव व पत्ता लेट जयकुमार टिबरेवाला इंग्लिश मिडीयम स्कूल, सानेगुरुजी नगर, जेलरोड, नाशिकरोड
शाळेच्या प्राचार्य/मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक पुर्ण नाव व संपर्क क्रमांक श्रीमती ज्योती दीपक मोदियानी
शाळेचा दुरध्वनी क्रमांक ०२५३-२४६९२२२
शाळेचा मेल आय. डी. nemsnashikroad@gmail.com
शाळेची वेबसाईट -