Kisan Madhyamik Vidyalaya Wakhari

शाळेचा इतिहास

शाळेचा इतिहास

स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय शिक्षणाचा वसा घेतलेल्या लोकांनी लोकमान्य टिळकांपासून प्रेरणा घेऊन नाशिकमध्ये शिक्षण विषयक भरीत कार्य करण्याच्या दृष्टीने नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था स्थापन केली व नावारूपाला आणली. त्या सर्व ऋषीतुल्य व्यक्ती कै.श्री.शि.रा. कळवणकर, कै.श्री.रं.कृ.यादीं, कै.शि.अ. अध्यापक, कै.वा.वि. पाराशरे, कै.ल.पं.सोमण या होत.

१ मे, १९९८ या दिवशी श्री. शंकरराव कर्डिले यांच्या वाड्यात न्यू इंग्लिश स्कूल या नावाने या शाळेची मुहूर्तमेढ रोवली गेली. उत्तरोत्तर अनेक उदार व शिक्षण प्रेमी धनिकांचा आश्रय संस्थेला मिळत गेला. त्यामुळे शिंदेकर वाडा व कालांतराने राजेबहाद्दर वाडा येथे भरणारी शाळा श्रीमंत माधवराव देशपांडे यांच्या उदार देणगीमुळे स्वतःच्या मालकीच्या इमारतीत भरू लागली. वाडिया चॅरीटीज आणि सुरगाणा संस्थान यांच्या अर्थसहाय्याने १४ खोल्यांच्या इमारतीचे बांधकाम पुर्ण होऊन १९३९ मध्ये नामदार श्री.जी.वी.मावळणकर यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. १९४३ मध्ये मुंबईचे प्रसिद्ध व्यापारी श्रीमान विलासरायजी व गोविंदरायजी रुंगटा यांनी आपल्या आदरणीय वडिलांच्या स्मरणार्थ देणगी देऊन संस्थेस कर्जमुक्त केले आणि जुलै १९४३ पासून जु.स.रुंगटा हायस्कूल या नावाने ही शाळा ओळखली जाऊ लागली.

शाळेमध्ये शिक्षकांसाठी अध्यापन वर्ग (एस.टी.सी.) खुले नाट्यगृह, क्रीडामंडळ, इ. उपक्रम सुरु झाले आणि शाळा हळूहळू नावारूपाला येऊ लागली. कन्या शाळा, प्राथमिक शाळा असा विस्तारही वाढू लागला सिन्नर, इगतपुरी, नांदगाव येथेही संस्थेच्या शाखा विद्यार्थ्यांच्या गर्दीने बहरून गेल्या.

या सर्व विस्ताराचा मूळ स्त्रोत असलेली जु.स. रुंगटा हायस्कूल ही शाळा नाशिक शहराची एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख बनली आहे.

शाळेच्या उपक्रमांचे फोटो व माहिती

शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप

शाळेच्या पहिल्या दिवशी इयत्ता ५ वी से ८ वी च्या विदयाथ्यांना शालेय पाठ्यपुस्तकाचे मोफत वाटप करण्यात

शाळेचे मुख्याध्यापक व शाळा समिती अध्यक्षांचे फोटो व नाव

शाळा समिती यादी

क्र. समिती सदस्याचे नाव समितीतील पद
1 मा. श्री. मिलिंद प्रभाकर कचोळे अध्यक्ष
2 मा. श्रीमती स्मिता पाठक सचिव
3 मा.डॉ.श्री.वि.वि.भोकरे सदस्य
4 मा.श्री.ज.गं. मेतकर सदस्य
5 मा. सौ.रु. जी. झोडगेकर सदस्य
6 मा.श्री.रा.शां. गायवन शिक्षक प्रतिनिधी

Contact Details

For any kind of query, contact us with the details below.

शाळेचे संपूर्ण नाव व पत्ता जु.स. रुंगटा हायस्कूल, घारपुरे घाट, अशोक | स्तंभ, नाशिक ४२२००२
शाळेच्या प्राचार्य/मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक पुर्ण नाव व संपर्क क्रमांक मा. श्रीमती स्मिता पाठक
शाळेचा दुरध्वनी क्रमांक ८७८८४७५४७४ /०२५३२५७८४३५
शाळेचा मेल आय. डी. jsrungtahighschool@gmail.com
शाळेची वेबसाईट