Late M.B.Chhajed Prathmik Vidya Mandir Nandgaon

शाळेचा इतिहास

शिक्षणाचा पाया हा प्राथमिक शिक्षणावर अवलंबून असतो. व्ही.जे. हायस्कूल सारख्या जुन्या माधामिक शाळेसही निकड जाणवू लागल्यामुळे व्ही.जे. हायस्कूलचे तत्कालिन मुख्याध्यापक कै. र.त्र्य.भार्गवे यांनी दि. ०८/०६/१९५९ रोजी नवीन मराठी शाळेची स्थापना केली.

सुरुवातीला शाळेचे इ. १ ते ४ चे ४ वर्ग होते. विध्यार्थी संख्या ८५ होती. १९७० पर्यंत 260 च्या पुढे विध्यार्थी संख्या गेली. १९७४ साली ५०० वर विध्यार्थी संख्या व १२ वर्ग तुकडया झाल्या. शाळेत लेखनिक व शिपाई यांची नेमणूक झाली. आज शाळेच्या १६ वर्ग तुकडया असून ७५० विध्यार्थी शिक्षण घेत आहेत.

सुरुवातीस शाळेला सरकारी अनुदान नसल्याने शाळेचा सर्व खर्च नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ करीत असे. १९८४ साला पासून शाळेला १००% अनुदान मिळू लागले. व्ही.जे. हायस्कूल मधील वर्ग खोल्या अपुऱ्या पडू लागल्यामुळे तेली गल्लीच्या कोपऱ्यावरील श्री.भास्करराव शिंदे यांची तीन मजली इमारत शाळेसाठी भाडयाने घेतली. याकामी व्ही.जे. हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.दि.मा.यार्दी सर यांनी विशेष प्रयत्न केले. बरीच वर्षे त्याठिकाणी शाळा भरत होती. परंतु पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहाची सोय नसल्या कारणाने मंडळाने देवकर यांच्या मळ्यातील २ हेक्टर १७ आर जागा पाच लक्ष रुपयांना खरेदी केली. इमारत बांधकामासाठी शाळेचे माजी विधार्थी तसेच नांदगाव मधील दानशूर व्यक्तींनी मोलाचे सहकार्य केले. श्री. रमणलालजी छाजेड यांनी स्व.मिश्रीलाल भिकचंद छाजेड यांचे स्मरणार्थ सात लाख रुपयांची उदार देणगी दिली. त्यामुळे नवीन मराठी शाळा, नांदगाव चे स्व.मिश्रीलाल भिकचंद छाजेड विद्यामंदिर असे नामकरण करण्यात आले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ प्रचारक मा.श्री. मोरोपंत पिंगळे यांचे शुभ हस्ते ३१ डिसेंबर २००० रोजी इमारतीचे भूमीपूजन झाले. दि.२३/११/2001 रोजी शाळेची वास्तुशांती करण्यात आली. ०३ डिसेंबर २००१ रोजी वाद्यांच्या गजरात मिरवणुकीने विधार्थ्यानी नवीन वास्तूत प्रवेश केला. विध्यार्थ्यांसाठी एक छोटेसे उद्यान तयार करण्यात आले. त्यानंतर संगणक कक्षाची स्थापना करण्यात आली. निसर्गरम्य वातावरणात विध्यार्थी आनंदाने शाळेत शिक्षण घेत आहे.

मराठी शाळेला पूरक असे बालमंदिर ३१ ऑगस्ट १९७० साली सुरु करण्यात आले. शालेय समिती, मातृमंडळ यांचे शासन नियमाप्रमाणे गठन करण्यात आले. ते शाळेच्या प्रगतीत मोलाची भर घालत आहे.

शाळेच्या उपक्रमांचे फोटो व माहिती

वसुंधरा वाचवा

• परिसर स्वच्छता विषयी मार्गदर्शन ,पर्यावरण प्रदूषण विषयक जागरूकता

.जागतिक महिला दिन ( ८ मार्च )

विविध वीर महिलांची वेशभूषा व भाषण स्पर्धा

स्व. मिश्रीलाल भिकचंद छाजेड स्मृतिदिन

विद्यार्थी भाषण

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती ( १४ एप्रिल )

स्वातंत्र्य सैनिक ओळख व परिचय त्यांच्या अनुभवाचे बोल

गणपती कार्यशाळा

शाडू मातीपासून गणपती तयार करणे. मार्गदर्शक – श्री. विजय चव्हाण सर

छंदवर्ग उद्घाटन

छंदवर्गात बुद्धिबळ, कॅरम, डॉजबॉल, लंगडी, हस्ताक्षर इ. विविध पैलूंचे मार्गदर्शन

शाळेचे मुख्याध्यापक व शाळा समिती अध्यक्षांचे फोटो व नाव

श्री. शांताराम गेणू उफाडे

मुख्याध्यापक
Email:

श्री. विजय वाल्मिक परदेशी

अध्यक्ष
Email:

शाळा समिती यादी

क्र. समिती सदस्याचे नाव समितीतील पद
1 श्री. विजय वाल्मिक परदेशी अध्यक्ष
2 श्री.शांताराम गेणू उफाडे सेक्रेटरी
3 श्री. रमणलाल मिश्रीलाल छाजेड सदस्य ( फेलोज )
4 श्री. मुकुंद काशिनाथ खरोटे सदस्य ( फेलोज )
5 श्री. भैयासाहेब तानाजी चव्हाण सदस्य ( टी.एम. )
6 श्री. विलास सुरेश गायकवाड शिक्षक प्रतिनिधी
7 श्रीमती. हर्षला हिरामण आवारी शिक्षकेतर प्रतिनिधी

Contact Details

For any kind of query, contact us with the details below.

शाळेचे संपूर्ण नाव व पत्ता स्व.मिश्रीलाल भिकचंद छाजेड विदयामंदिर, नांदगाव
शाळेच्या प्राचार्य/मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक पुर्ण नाव व संपर्क क्रमांक श्री. शांताराम गेणू उफाडे ९९६०१०११९६
शाळेचा दुरध्वनी क्रमांक
शाळेचा मेल आय. डी. mbchhajed12@gmail.com
शाळेची वेबसाईट -