Arts & Commerce Mahavidyalaya, Igatpuri

शाळेचा इतिहास

महाराष्ट्रातील अग्रगण्य शैक्षणिक संस्थांमध्ये १०४ वर्षे पूर्ण केलेली नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाची यशस्वी वाटचाल अविरतपणे आजही चालू आहे. ह्याच संस्थेची एक शाखा इगतपुरी सारख्या आदिवासी भागात विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने कला व वाणिज्य महाविद्यालयाची स्थापना १५ जुन २०१२ साली करण्यात आली.

विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर त्यांची सजर्नशीलता, प्रबलता, कल्पकता वाढावी व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी सतत प्रयत्नशील आहेत. महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख आपल्या विभागात नवनवीन उपक्रम, कार्यक्रम व महत्वपूर्णघटना यावर प्रकाश टाकणारे विविध शैक्षणिक विभाग, अभ्यासपूरक व अभ्यासेतर उपक्रमांचे आयोजन केले जाते. विशेष गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत विविध तज्ञांची व्याख्याने आयोजित केली जातात.

महाविद्यालयातील प्रगतीमधील प्रमुख टप्पा म्हणजे “सुर्यनमस्कार एक अविष्कार” ह्या उपक्रमांची नोंद 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया' अशी जागतीक स्तरावर नोंद घेतली गेली.

शाळेच्या उपक्रमांचे फोटो व माहिती

मोफत लसिकरण मोहिम

इगतपुरी शहरातील अल्पउत्पन्न धारक आणि नागरीकांसाठी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ आणि अशोका मेडिकवर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत लसीकरण मोहिम दि. २२/१०/२०२१ रोजी राबविण्यात आली.

मराठी भाषा गौरव दिन

कविवर्य कुसूमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त २८/०२/२०२२ रोजी महाविद्यालयामध्ये कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक श्री. कैलास गुजराथी यांनी मराठी भाषेचे महत्व अनेक उदाहरणांद्वारे समजावून सांगितले. तसेच गीतगायन, काव्यवाचन, भाषण, एकपात्री नाटक असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.

औद्योगिक क्षेत्र भेट

तृतीय वर्ष वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांना उद्योजकतेविषयी प्रत्यक्ष माहिती मिळावी, प्रत्यक्ष कामकाज कसे चालते याबद्दल ज्ञान मिळावे आणि भविष्यकाळात रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यादृष्टीने मागदर्शन मिळण्यासाठी औद्योगिक क्षेत्र भेट आयोजित केली गेली.

कौशल्य विकास कार्यशाळा

महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी 'कौशल्य विकास' कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यशाळेत ताणतणाव, नेतृत्व कौशल्य या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच देहबोली, सकारात्मक दृष्टीकोन, संवाद कौशल्य इत्यादी विषयांवर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती.

शाळेचे मुख्याध्यापक व शाळा समिती अध्यक्षांचे फोटो व नाव

प्रा. प्रतिभा हिरे

प्र. प्राचार्य
Email:

मा. श्री. सुराणा हेमंत तेजमल

अध्यक्ष
Email:

शाळा समिती यादी

क्र. समिती सदस्याचे नाव समितीतील पद
1 श्री. सुराणा हेमंत तेजमल व्यवस्थापनाचा अध्यक्ष किंवा त्याची नामनिर्देशित व्यक्ती, पदसिध्द अध्यक्ष
2 श्री. जोशी हेमंत शामकांत व्यवस्थापनाचा सचिव किंवा नामनिर्देशित व्यक्ती
3 प्रा. श्रीमती. अहिरे ललिता सुभाष प्राचार्य किंवा परिसंस्था प्रमुखाद्वारे नामनिर्देशित करावयाचा एक विभाग प्रमुख
4 १) प्रा. श्री. घोरपडे विजय शांतीलाल २) प्रा. श्रीमती. मोरे भाग्यश्री संभाजी पूर्णकालिन मान्यताप्राप्त अध्यापकांनी त्यांच्या मधुन निवडून दिलेले महाविद्यालयातील किंवा मान्यताप्राप्त परिसंस्थेतील तीन अध्यापक यापैकी किमान एक महिला असेल
5 श्री. खातळे सुहास लक्ष्मण नियमित अध्यापकेतर कर्मचारी यांनी त्यांच्या मधुन निवडून दिलेला एक अध्यापकतेर कर्मचारी
6 प्रा.श्री.गिरी देविदास व्यवस्थापनाने प्राचार्यांशी विचार विनिमय करुन शिक्षण, उद्योग, संशोधन आणि समाजसेवा या क्षेत्रातून नामनिर्देशित केलेले चार स्थानिक सदस्य, यापैकी किमान एकजण हा माजी विद्यार्थी असेल.
7 प्रा. श्री. मुसळे सचिन रामदास समन्वयक : महाविद्यालय अंतर्गत गुणवत्ता हमी समित
8 प्रा. श्री. वामन नितीन गोरक्षनाथ महाविद्यालय विद्यार्थी परिषदेचे सभापती व सचिव
9 प्रा.श्रीम. प्रतिभा हिरे महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा परिसंस्थेचा प्रमुख, प्रभारी प्राचार्य, प्रा.श्री.वामन नितीन सदस्य सचिव

Contact Details

For any kind of query, contact us with the details below.

शाळेचे संपूर्ण नाव व पत्ता नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय, इगतपुरी महात्मा गांधी हायस्कूल कॅम्पस, इगतपुरी
शाळेच्या प्राचार्य/मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक पुर्ण नाव व संपर्क क्रमांक प्रा. वामन नितीन गोरक्षनाथ ९८९०८०६७३०
शाळेचा दुरध्वनी क्रमांक ०२५५३२४४८८५
शाळेचा मेल आय. डी. nspmacm@gmail.com
शाळेची वेबसाईट http://www.nspm- acmigatpuri.in