Mohinidevi Roongta Prathmik Vidyamandir Nashik

शाळेचा इतिहास

आदर्श मराठी शाळा, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाने १९४४ सालापर्यंत माध्यमिक शाळा चालविल्या परंतु हा पाया प्राथमिक शिक्षणावर अवलंबून असल्याने विद्यार्थ्यांची प्रगती सत्वर होईल या दृष्टीने आधुनिक पद्धतीने शिक्षण देणारी प्राथमिक शाळा म्हणजे आदर्श मराठी शाळा.

शाळेतील विद्यार्थी पटसंख्या व समाधान कारक उपस्थिती यामुळे शाळा नावाप्रमाणेच प्रसिद्धीस आली. याचे कारण म्हणजे जनतेचे शाळेवर असणारे प्रेम होय. कै.रा. अंबक बाळाजी देशपांडे, सिन्नर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नातवंडांनी त्यावेळी ५१०० रुपये दिले. सुरुवातीस ३ खोल्या बांधून पूर्णत्वास आल्या. त्या ३ खोल्या व रुंगटा हायस्कूलचे काही वर्ग अशा ठिकाणी विद्यार्थी बसू लागले. मुख्याध्यापक पदाची सूत्रे वि.गो.भट व अधीक्षक पदाची सूत्रे प्र. रा . माचवे यांनी घेतले

१७ मार्च १९८८ साधी आदर्श मराठी शाळेच्या नवीन इमारतीच्या पायाभरणी चे भूमिपूजन माननीय रत्नाकर कुलकर्णी प्रशासक म.न.पा यांच्या हस्ते होऊन तेव्हा ७ वर्ग व स्वच्छतागृह,ऑफिस अशी नवीन सुसज्ज इमारत उभी राहिली.

* नामकरण सोहळा व पहिल्या मजल्याचे उद्घाटन* आदर्श मराठी शाळा नाशिक या शाळेच्या पहिल्या मजल्याचे उद्घाटन व नामकरण सोहळा २० नोव्हेंबर २००० रोजी देणगीदार माननीय श्री जगमोहन सेठ रुंगठा यांच्या शुभहस्ते झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री. द.श.नाईक होते.

आदर्श मराठी शाळा नाशिक या शाळेचे, मोहिनी देवी रूंगता प्राथमिक विद्यामंदिर नासिक असे नामकरण करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी माननीय श्री अरुण कुमार रुंगटा 1, सौ चंद्रलेखा रुंगटा तसेच रुंगटा परिवार उपस्थित होता. सदर नामकरण सोहळा यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री य.दा. वाजे, अधीक्षक माननीय श्री सुरेश गायधनी व शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

*संरक्षक भिंतीचे भूमिपूजन •

मोहिनी देवी रुंगटा प्राथमिक विद्यामंदिर, नासिक, पूर्व-पश्चिम संरक्षक भिंतीचे भूमिपूजन होऊन बांधकाम पूर्ण झाले. अनेक वर्षापासून विविध अडचणींमुळे हा प्रश्न प्रलंबित होता. कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष व नासिक संकुल प्रमुख माननीय श्री. दाबक सर यांचे विशेष प्रयत्न. तसेच सामाजिक कार्यकर्ते दि.गो.शिरसाट यांच्या अथक परिश्रमामुळे संरक्षक कितीचे काम पूर्णत्वास आले.

"दुसरा मजला उद्घाटन सोहळा.

संस्थेचे सन्माननीय देणगीदार श्रीमान जगमोहन लालजी रुंगठा यांच्या कुटुंबीयानी दिलेल्या रुपये २१,००,०००/ च्या देणगीतून दिनांक १९ एप्रिल २०१३ राम नवमीच्या दिवशी मोहिनी देवी रुंगटा प्राथमिक विद्यामंदिराच्या दुसऱ्या मजल्यावरील ५ वर्ग खोल्यांचा उद्घाटन समारंभ व कोनशिला अनावरण समारंभ श्रीमान अरुणकुमार रुंगटा व सौ चंद्रलेखा रंग टा यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

शाळेच्या उपक्रमांचे फोटो व माहिती

शाळेचे मुख्याध्यापक व शाळा समिती अध्यक्षांचे फोटो व नाव

सौ. मिनाक्षी अप्पाजी भारती

मुख्याध्यापिका
Email: mabharati66@gmail.com

मा. श्री. शरद जाधव

शाळा समिती अध्यक्ष
Email: srjassociatensk@gmail.com

शाळा समिती यादी

क्र. समिती सदस्याचे नाव समितीतील पद
1 मा. श्री. शरद रा. जाधव अध्यक्ष
2 सौ. मिनाक्षी अ. भारती सेक्रेटरी
3 श्री. अमोल काळे सदस्य ( फेलोज )
4 सौ. मैत्रेयी काळे सदस्य
5 श्री. श्रावण सुर्यवंशी सदस्य ( फेलोज )
6 श्री. हरिराम गवळी शिक्षक प्रतिनिधी
7 सौ. जयश्री देशमुख निमंत्रित सदस्य