Pushpavati Roongta Kanya Vidyalaya Nashik

शाळेचा इतिहास

स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय शिक्षणाचा वसा व लोकमान्य टिळकांपासून प्रेरणा घेतलेल्या देशभक्त तरुणांनी शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य करण्याच्या हेतूने नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना केली. १ मे१९१८ रोजी न्यू इंग्लिश स्कूल या नावाने संस्थेची पहिली शाळा सुरु झाली. पुढे शाळेचे नामकरण ‘जु.स. रुंगटा हायस्कूल’असे झाले.

पुणे येथील सेवासदन सोसायटीने चालविलेली नाशिक मधील कन्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर होती. मुली शिक्षणापासून वंचित राहू नये, त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्य लक्षात घेता ही शाळा ताब्यात घेण्याची मंडळाला विनंती केली. जून १९४६पासून ही शाळा संस्थेने आनंदाने ताब्यात घेतली.

जु.स. रुंगटा हायस्कूलच्या इमारतीत ही शाळा सुरू झाली. १९४७ मध्ये माननीय श्री.जगमोहन राय यांनी आपली पत्नी कै.सौ.पुष्पावती यांच्या स्मरणार्थ भरघोस देणगी दिली व त्यातूनच आकारास आली ‘पुष्पावती रुंगटा कन्या विद्यालयाची’ स्वतंत्र इमारत. अत्यल्प काळातच शाळेची कीर्ती वाऱ्यासारखी पसरली व विद्यार्थिनी संख्येबरोबरच शाळेचा लौकिक व प्रतिष्ठा वाढतच गेली. १९७२ मध्ये मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू माननीय श्री रं.कृ. टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळेने रौप्य महोत्सव संपन्न केला .त्यानंतर १९९५ मध्ये पुष्पावती यांच्या कन्या माननीय सुनीता मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळेचा सुवर्ण महोत्सव दिमाखात संपन्न झाला. तर २००६ मध्ये अरुण कुमार रुंगठा यांच्या साक्षीने हीरक महोत्सवही संपन्न झाला .

संस्थेच्या शतक महोत्सवाचे औचित्य साधून शाळेची जुनी इमारत पाडून नवीन इमारत साकारली गेली. सन २०२०-२१ मध्ये शाळेने अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले .या ७५ वर्षांच्या वाटचालीत शाळेच्या असंख्‍य माजी विद्यार्थिनींनी आपल्या कर्तुत्व व विद्वत्तेने शाळेची कीर्ती सर्वदूर पसरवली आहे. शिक्षकांनी सुद्धा अगदी राष्ट्रपती पुरस्कार मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

अशी ही शाळेची तेजोमय परंपरा आजतागायत जपली जात आहे

शाळेच्या उपक्रमांचे फोटो व माहिती

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती

क्रांतीज्योती सावित्र्रीबाई फुले जयंतीनिमित्त वेशभूषा स्पर्धा

पारितोषिक वितरण समारंभ

)स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व्याख्यानमाला

)इ.१० वी आशीर्वाद समारंभ

जागतिक महिला दिन

अटल टिंकरिंग लॅब उद्घाटन सोहळा

)मराठी राजभाषा दिन

एकात्मिक शिक्षण –शिक्षकांसाठी कार्यशाळा

)सूर्यनमस्कार

राष्ट्रीय मतदार दिन

कोव्हीड लसीकरण मोहीम

राष्ट्रीय गणित दिन

)भारतीय संविधान दिन –निबंध स्पर्धा बक्षीस वितरण

शारदोत्सव

राष्ट्रीय क्रीडा दिन

सायकल वितरण सोहळा

पुष्पावती दिन

राष्ट्रीय विज्ञान दिन – तरंग चित्र स्पर्धा

शाळेचे मुख्याध्यापक व शाळा समिती अध्यक्षांचे फोटो व नाव

सौ.यशश्री दीपक कसरेकर

मुख्याध्यापक
Email: yashashree.21@gmail.com

श्री.विलास वसंत पूरकर

शाळा समिती अध्यक्ष
Email: vilas.purkar@yahoo.com

शाळा समिती यादी

क्र. समिती सदस्याचे नाव समितीतील पद
1 श्री.विलास पुरकर अध्यक्ष
2 सौ.यशश्री कसरेकर सेक्रेटरी
3 श्रीमती शुभदा बर्डे सदस्य
4 श्री.नितीन काळे सदस्य
5 सौ.स्वाती जोशी सदस्य
6 श्रीमती सुचेता कुकडे शिक्षक प्रतिनिधी
7 श्री.शेखर ढेपे शिक्षकेतर प्रतिनिधी

Contact Details

For any kind of query, contact us with the details below.

शाळेचे संपूर्ण नाव व पत्ता पुष्पावती रुंग्टा कन्या विद्यालय, नाशिक. घारपुरे घाट , अशोक स्तंभ , नाशिक.
शाळेच्या प्राचार्य/मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक पुर्ण नाव व संपर्क क्रमांक मुख्याध्यापिका. सौ.यशश्री दीपक कसरेकर, मो.९८२२१७३२०४ पर्यवेक्षिका.श्रीमती. सुचेता एकनाथ कुकडे, मो.९०७५०२१०८२
शाळेचा दुरध्वनी क्रमांक ०२५३-५७३५०५
शाळेचा मेल आय. डी. Prkv1955@gmail.com
शाळेची वेबसाईट -