Chandak Kanya Vidyalay Sinnar

शाळेचा इतिहास

मातोश्री चंद्रभागाबाई व आयोध्याबाई चांडक कन्या विद्यालय सिन्नर

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक या संस्थेतील सिन्नर येथे ग्रामीण भागातील मुलींसाठी शिक्षणाची स्वतंत्र सोय करून देणारी आणि शिक्षणासाठी हक्काचे स्थान व व्यासपीठ उपलब्ध करून दिलेली मुलींची एकमेव शाळा म्हणजे चंद्रभागाबाई आणि आयोध्याबाई चांडक कन्या विद्यालय.

संस्थेने सिन्नर गावातच नव्हे तर सिन्नर तालुक्यात स्वतंत्र कन्या विद्यालयाची मुहूर्तमेढ १ सप्टेंबर १९६६ रोजी केली.

गुरुवर्य रं. कृ. यार्दी तसेच संस्थेचे पदाधिकारी यांच्या प्रयत्नाने १ सप्टेंबर १९६८ साली या विद्यालयास सरकारी मान्यता मिळाली.

एका वर्षातच कल्पक व प्रयत्नशील मुख्याध्यापिका सौ. सुनंदा लेले यांनी विविध सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांनी हे विद्यालय गावातच नव्हे तर सर्व तालुक्यात नावारूपास आले. विद्यालयास स्वतंत्र इमारत असावी, अशी इच्छा सिन्नर मधील सुप्रसिद्ध उद्योगपती श्रीमान नरसिंग व श्रीमान या बंधुद्यापुढे व्यक्त केली. शिक्षणाबद्दल आवड असलेल्या या बंधुंनी आपल्या संस्थेच्या पदाधिकारी यांची विनंती लगेच मोठ्या उदार अंतकरणाने मान्य केली.

श्रीमान रामनाथशेठ चांडक यांनी स्वतः पूर्ण लक्ष देऊन १९७१ साली आठ खोल्यांची सुंदर वास्तू बांधून दिली. ह्या कन्या विद्यालयाचे मातोश्री चंद्रभागाबाई व मातोश्री आयोध्याबाई चांडक कन्या विद्यालय सिन्नर असे नामकरण करण्यात आले

विद्यालयाच्या जसजसा विकास होत गेला, तस तशा त्याच्या गरजाही वाढू लागल्या या गरजांची पुर्ती संस्था व देणगीदारांनी केली

१९८०- जलकुंभ श्री रमाकांत पंडित आणि कुटुंबीय.

१९८३ - संस्थेने विज्ञान कक्ष
- कार्यालय श्री जयंत शत्रिय

१९९२-९३ संस्था व चांडक कुटुंबीय यांनी चित्रकला कक्ष आणि भिकुलालजी भुतडा रंगमंच तसेच श्री नरहर जाखडी परिवार, चांडक परिवार, राखी परिवार, काबरा परिवार, श्रीमती नलिनी पुरोहित यासारख्या अनेक देणगीदारांनी उदार हस्ते शाळा उभारणीसाठी योगदान दिले.

१९९४-९५ यावर्षी शाळेने रौप्य महोत्सव साजरा करताना विविध उपक्रमांच्या माध्यमातून अनेक मान्यवरांच्या आठवणी व त्यांचे ऋण व्यक्त करताना ‘रौप्यसुधा’ हे मासिक काढले या काळात श्रीमती विजया काबरा, श्रीमती राठी आणि चांडक परिवाराने शाळेला भरघोस देणगी देऊन शाळेच्या विस्तारात भर घातली.

विद्यालयाचे अनेक गुणी विद्यार्थिनी घडविल्या, प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा परीक्षा, क्रीडा स्पर्धा, नाट्य महोत्सव, नृत्य, संगीत क्षेत्र, विज्ञान संशोधन इत्यादी क्षेत्रात स्वतःला सिद्ध करीत परदेशातही विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.

शाळेने १ सप्टेंबर २०१६ रोजी ५० वर्षे पूर्ण केले. या सुवर्ण महोत्सवी वर्षाची वाटचाल चालू असतांना समाजात शाळेने आहे एक वेगळाच ठसा उमटविला आहे. समाजात स्नेह, विश्वास, शिस्त, संस्कार, गुणवत्ता या सर्व गुणांचा आणि भावनांचा ओलावा जपत आपला लौकिक वाढवीत आहे.

शाळेतील विद्यार्थिनींनी प्रत्येक क्षेत्रात जसे डॉक्टर, शिक्षिका, इंजिनियर संशोधक, अभिनय, गृहिणी या सर्वच क्षेत्रात उत्तुंग यश मिळविले आहे.

वाढती विद्यार्थिनींची संख्या लक्षात घेता विद्यार्थिनींना बसण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नव्हती त्यावेळेस विद्यार्थिनींचे वर्ग तीन वेगवेगळ्या इमारतींमध्ये बसत, कंपाउंड बाहेरील इमारत,संजीवनी शाळेच्या इमारतीत व शेठ ब.ना.सारडा व विद्यालयाच्या इमारतीत काही वर्ग बसत.

विद्यार्थिनी या वेगवेगळ्या भागातून शाळेत येत असतात. त्यातील काही विद्यार्थिनी कंपनी कामगार कामगार,विडी कामगार, मजुरी करणाऱ्या पालकांच्या आहेत. हे पालक सकाळ सत्रात मुलींना शाळेत पाठवीत असे साधारणपणे येथील पालक वर्ग हा बिडी उद्योग मधील बिडी बांधणारा मजूरवर्ग, त्यांच्या मुलींना चांगले शिक्षण मिळावे म्हणून उद्योगपतींनी सामाजिक व शैक्षणिक कार्य सुरू केले.

या उद्योगाला पूरक कामगार वर्ग तयार झाला. या कामगार वर्गाच्या मुलींना शिक्षणाची सुविधा निर्माण व्हावी, या उद्देशाने मातोश्री चं व अ चांडक कन्या विद्यालय ही मुलींची शाळा सुरू झाली.

त्यानंतर सिन्नर मध्ये औद्योगीकरणाची सुरुवात होऊन नवे उद्योग पर्व सुरू झाले.

सिन्नर शहराच्या मुसळगाव मालेगाव या दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्रांती झाली. मोठ्या कंपन्या या भागात सुरू झाल्या. त्यामुळे अत्यंत मोठा कामगार वर्ग मोठ्या संख्येने कुटुंबासह सिन्नर शहरात व शहरालगत वसाहत करून राहू लागला.

त्या कंपनी कामगारांच्या मुलींनीही शिक्षणासाठी चांडक कन्या विद्यालयास प्राधान्य दिले तेव्हापासून विद्यालयातील विद्यार्थिनींची संख्या वाढू लागली. त्यावेळेस विद्यालयाची सद्य स्थितीतील इमारत कमी पडू लागली.

विद्यार्थिनींची गरज लक्षात घेता विद्यालयाने सन २००३-२००४ मध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू केले.

विद्यालयातील विद्यार्थिनींची वर्ग बसण्यासाठी होणारी अडचण लक्षात घेता; नाशिक शिक्षण प्रसारक मंडळातील पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या शतकमहोत्सवी वर्षात विद्यालयासाठी नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण केले. या वास्तूचे भूमिपूजन देणगीदार चांडक कुटुंबियांच्या हस्ते संपन्न झाले.

तर इमारतीचे उद्घाटन बुधवार दिनांक १८ एप्रिल २०१८ रोजी मा. ना. श्री चंद्रकांत (दादा) पाटील (मंत्री महसूल मदत व पुनर्वसन सार्वजनिक बांधकाम महाराष्ट्र शासन) यांच्या हस्ते झाले.

अतिशय भव्य व आकर्षक वास्तु मुलींच्या शिक्षणासाठी देणगीदारांच्या व संस्थेच्या सहकार्याने आज अतिशय दिमाखात उभी आहे.

सिंन्नर मधील चांडक कन्या विद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनी या विविध भागातील आहे.

व्यापारी वर्ग नोकरी व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले, कंपनी कामगार वर्ग, शेतकरी कुटुंबातील मध्यमवर्गीय, अशा सर्व स्तरातील विद्यार्थिनी विद्यालयातून शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.

सिन्नर शहराचा विस्तार लक्षात घेता नवीन इमारत शाळेचे एक वैशिष्ट्य ठरले आहे. नवीन इमारत सर्व सोयींनी युक्त आहे इयत्ता ५ वी ते १० वी सेमी इंग्रजी –चा दरवर्षी १००% टक्के निकालाची परंपरा!

अद्ययावत संगणक कक्ष, अद्ययावत प्रयोगशाळा, डिजिटल क्लासरूम, सुसज्ज ग्रंथालय, फंक्शनल इंग्लिश कोर्स, भव्य सभागृह, भव्य क्रीडांगण सुरक्षतेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा, इयत्ता 10 वी तील विद्यार्थिनींची गुणवत्ता वाढीसाठी विशेष वर्ग व प्राविण्य वर्गाचे आयोजन, उत्साही व कार्यक्षम पालक-शिक्षक संघ, विविध संस्कार शिबिराचे आयोजन, विद्यार्थिनींची वैद्यकीय तपासणी, क्रीडा नैपुण्यासाठी क्रिडा प्रबोधनी,

सर सी व्ही रमण टॅलेंट अकॅडमी अंतर्गत विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन- उच्च प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा

डॉ. होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षा एम. टी. एस. ,एन.एम. एम. एस. परीक्षा, एन टी एस परीक्षा, चित्रकला स्पर्धा परीक्षा कु. प्रियंका घोडके, कु. माया सोनवणे या विद्यार्थिनी सध्या महाराष्ट्राच्या संघाकडून खेळत आहेत. बुद्धिबळ, कुस्ती, तायक्कांदो या क्रीडाप्रकारात विद्यार्थिनींची राज्य स्तरावर, विभागीय स्तरावर निवड झालेली आहे.

चांडक कन्या विद्यालयाचे लेझीम पथक सिन्नर शहराचा एक आकर्षण ठरू पाहत आहे. विज्ञान प्रदर्शन, वैज्ञानिक एकांकिका, राज्यस्तरीय बाल एकांकिका स्पर्धा. या सर्व स्पर्धा प्रकारात विद्यालयातील विद्यार्थिनींनी प्राविण्य प्राप्त केले.

शालांत परीक्षा २०२१ मध्ये १००% गुण मिळविणाऱ्या चार विद्यार्थिनी आहेत. कु. वाघ प्राजक्ता संजय हिने एस.एस.सी बोर्डात ठेवलेल्या पारितोषिके प्राप्त केली आहे.

संस्थेच्या सहकार्याने विद्यालयातील प्रगतीची घोडदौड अत्यंत उत्साहात व वेगात सुरू आहे. यात सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर यांचे मोलाचे सहकार्य लाभते.

शाळेच्या उपक्रमांचे फोटो व माहिती

आषाढी एकादशी

आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा. प्रगती भजनी मंडळाचा कार्यक्रम. इ.५ वी ते ८ वी अभंग गायन स्पर्धा व ९वी, १०वी निबंधलेखन स्पर्धा.

वृक्षारोपण संकल्प

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ७५ वृक्षारोपणाचा संकल्प त्यानुसार संस्था पदाधिकारी ,विविध मान्यवर,विद्यार्थिनी,शिक्षक,पालक यांनी आज पर्यंत ७५ पेक्षा अधिक वृक्षारोपण केले.

कै लक्ष्मीबाई लेले तालुकास्तरीयवक्तृत्व स्पर्धा

सन्मा. कार्यकारी मंडळ उपाध्यक्ष श्री. एम.जी.कुलकर्णी व अॅड. श्री.श्रीराम क्षत्रिय तसेच अॅड. मा.श्री.धीरेंद्र पोंक्षे यांच्या उपस्थितीत ५८ वी वक्तृत्व स्पर्धा संपन्न. एकूण ६५ विद्यार्थ्यांचा सह्भाग

पंतप्रधानांना पत्रलेख

भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशाचे मा. श्री. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २०४७ सालातील माझ्या कल्पनेतील भारत व अज्ञात क्रांतिकारक या विषयांवर पत्रलेखन. ७५ या आकड्यानुसार बैठक रचना करून एकूण २२८ विद्यार्थिनीचे पत्रलेखन.

मनाचे श्लोक

१ जुलै पासून विद्यार्थिनीसाठी निवडक मनाचे श्लोक व निरुपण यांचे व्हिडीओ शाळेतील शिक्षक सौ.दुसाने, सौ. कुलकर्णी, श्रीमती देवरे, श्री.जोशी यांनी तयार करून वर्गावर्गाना पाठविले. ३ मार्च रोजी मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा घेऊन माहेश्वरी महिला मंडळ सदस्या व शाळेच्या स्न्मा. देणगीदार सौ.राखी भाभी चांडक यांच्या हस्ते विद्यार्थीनीना बक्षीस देण्यात आले.

भारुड

कोरोना १९ या वैश्विक महामारीच्या जनजागृतीसाठी शाळेतील शिक्षिका श्रीमती चारुशीला देवरे लिखित दिग्दर्शित भारुड सिन्नर मधील चौकाचौकात विद्यार्थिनीद्वारे सादरीकरण करून जनप्रबोधन.

कथा क्रांतिकारकांच्या

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त शाळेत दर सोमवारी कथा क्रांतिकारकांच्या या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनी व शिक्षक यांनी कथा सांगितल्या.

कथा क्रांतिकारकांच्या

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त शाळेत दर सोमवारी कथा क्रांतिकारकांच्या या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनी व शिक्षक यांनी कथा सांगितल्या.

स्वच्छता अभियान

गाडगे महाराज जयंती निमित्त पालक, शिक्षक व विद्यार्थिनी यांनी स्वच्छता मोहीम राबविली शाळा व आजू बाजूचा परिसर स्वच्छ करून वृक्षारोपण केले.

EnglishElocution Competion स्पर्धा

इंग्रजी विभागाच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त इ.५ वी ते ९ वी च्या विद्यार्थिनीसाठी English Elocution Competion स्पर्धा घेण्यात आली. एकूण ६५ विद्यार्थिनीचा सहभाग.

समुपदेशन व्याख्यान

इ.१० वी च्या विद्यार्थिनीसाठी सौ.वृषाली सानप-काळे(शिक्षिका, श्रीमान योगी शिव छत्रपती शेतकरी विद्यालय, गुळवंच) यांचे परीक्षेला सामोरे जाताना या विषयावर व्याख्यान.

महिला दिन

महिला दिनानिमित्त मुख्य न्यायाधीश सौ.छाया शिरसाठ, प्रसिध्द उद्योजिका सौ.शारदा आव्हाड व आरोग्य सेविका सौ. स्वाती भडांगे यांची विद्यार्थीनिनी मुलाखत घेतली व यथोचित सत्कार करण्यात आला तसेच सिन्नर मधील सैनिक पत्नी न सैनिक माता यांचाही सत्कार करण्यात आला.

गुणगौरव

सन २०२०-२१ माध्यमिक शाळांत परीक्षेत सुयश प्राप्त विद्यार्थिनीचा गौरव करून त्यांचे कौतुक करण्यात आले.

शाळेचे मुख्याध्यापक व शाळा समिती अध्यक्षांचे फोटो व नाव

मा. श्रीमती. हिरे रेखा दामोदर

मुख्याध्यापिका
Email:

मा. अॅड. श्री. श्रीराम वसंतराव क्षत्रिय

अध्यक्ष, शालेय समिती
Email:

शाळा समिती यादी

क्र. समिती सदस्याचे नाव समितीतील पद
1 मा.श्री.श्रीराम वसंतराव क्षत्रिय अध्यक्ष
2 मा.श्रीमती हिरे रेखा दामोदर सेक्रेटरी
3 मा.श्री.योगेश अशोक थत्ते सदस्य ( फेलोज )
4 मा.श्री. मनीष रघुनाथ गुजराथी सदस्य ( फेलोज )
5 मा.सौ. स्वप्ना गिरीष मालपाठक सदस्य ( टी एम )
6 मा.श्री. दीपक गणपतसा बाकळे शिक्षक प्रतिनिधी
7 मा.श्री. सतीश काशीनाथ बागुल शिक्षकेतर प्रतिनिधी

Contact Details

For any kind of query, contact us with the details below.

शाळेचे संपूर्ण नाव व पत्ता मातोश्री चंद्रभागाबाई व अयोध्याबाई चांडक कन्या विद्यालय, रेव्हेन्यू रोड, पंचायत समिति समोर, सिन्नर ता.सिन्नर जि.नाशिक
शाळेच्या प्राचार्य/मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक पुर्ण नाव व संपर्क क्रमांक मुख्याध्यापिका - श्रीमती. हिरे रेखा दामोदर 8975975523 पर्यवेक्षक - श्री. चंद्रभान नामदेव कोटकर 9850711258 ( दी.३०/०४/२०२२ रोजी सेवानिवृत्त होत आहे )
शाळेचा दुरध्वनी क्रमांक 02551 - 220174
शाळेचा मेल आय. डी. ckvidyalay1964@gmail.com
शाळेची वेबसाईट -